जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका मुख्य चौकातील मैदानावर तरुणाने लावलेल्या दुचाकीतून २ मोबाईल लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, शहरातील पिंप्राळा परिसरातील रहिवासी कल्पेश संजय महाजन (वय २३) हा तरूण दि १९ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मित्रासोबत असतांना तो दुचाकी शहरातील जी.एस.ग्राऊडवर लावलेली असतांना अनोळखी चोरट्यांनी दुचाकीची डिक्की उघडून त्यातील २ मोबाईल २० हजार किमतीचे लंपास केले आहे. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.रुस्तम तडवी हे करीत आहेत.