लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: आज सकाळी कांचन नगरात थेट घरात घुसून गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात हल्लेखोरांना यश आले नाही. या प्रकरणी शनीपेठ पोलिस स्टेशनला गु.र.न.208/21 भा.द.वि. 307, 324, 323, 504 व 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काही तासातच अटक केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांनी पथक नेमूनदिले होते. या पथकात सहायक फौजदार अशोक महाजन, हे.कॉ. विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, अक्रम शेख, जितेंद्र पाटील, लक्ष्मण पाटील, सुरज पाटील, राहुल पाटील, पोलिस नाईक प्रितम पाटील, अविनाश देवरे यांनी संशयीत तिनही आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली आहे.
मिलींद शरद सकट रा. गेंदालाल मिल जळगाव तर पिंप्राळा हुडको परिसरातून, प्रद्युम उर्फ बंटी नंदु महाले रा. पिंप्राळा आणि राहुल सुरेश गजरे रा.सिद्धार्थ नगर हुडको या दोघेही भोईटे नगर रेल्वे गेट जवळच्या यश लॉन परिसरातून ताब्यात घेऊन अटक केली आहे.