• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तरुणाला पडली फेसबुकवर कमेंट करणे महाग पुढे घडले ते धक्कादायक !

editor desk by editor desk
January 19, 2023
in क्राईम, राज्य
0
तरुणाला पडली फेसबुकवर कमेंट करणे महाग पुढे घडले ते धक्कादायक !

नाशिक : वृत्तसंस्था 

शहरात गुन्हेगारीने चांगलेच डोकं वर काढले आहे. नाशिक शहरात सलग दोन दिवस खुनाच्या घटना घडल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सातपुरच्या काश्मिरे मळे परिसरात झालेल्या खुनाच्या घटनेने तर शहरात खळबळच उडाली आहे. खरंम्हणजे मुलगी सारखी घरातून निघून जाते म्हणून वडिलांनी मुलीचा गळा आवळून मारून टाकल्याची बाब ताजी असतांना दोघा मित्रांनी तिसऱ्या मित्राला संपवल्याची बाब समोर आली आहे. नाशिक शहरातील काश्मिरे मळा परिसरात चाळीत राहणाऱ्या परप्रांतीय कामगाराचा हा खून झाला होता. मात्र, यामागील कारण काय याबाबत स्पष्टता येत नसल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. पोलीस दलातील प्रमुख अधिकाऱ्यांनी पाहणी करूनही अद्यापही आरोपींचा शोध लागलेला नाही. मात्र खुणाचं कारण जवळपास निश्चित झाल्याने जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

धारधार शस्राने वार करून संतोष जयस्वाल या तरुणांची त्याच्याच दोन मित्रांनी हत्या केल्याचे उघड झाले आहे. ते दोघेही फरार असून नाशिक पोलीस त्यांच्या मागावर आहेत. मुन्ना निषाद, नरसिंग निषादयांच्यासह मयत संतोषचा मित्र असलेल्या लखनच्या फेसबूक पोस्टला संतोष वारंवार कमेंट करत असे, त्यावरून मुन्ना आणि रामकृष्ण निषाद यांच्यात कायम वाद होत असायचा.

संतोष आणि मुन्ना निषाद, नरसिंग निषाद यांच्यात याच कारणावरून वाद सुरू असतांना संतोष डोक्यात दोघांनी लोखंडी रॉड टाकला, यामध्ये संतोषचा मृत्यू झाला आहे. लखणच्या फेसबूक पोस्टला मयत संतोष कायम कमेंट करत असल्याने दोन मित्रांमध्ये वाद होत असल्याने झालेल्या वादात एका मित्राचा खून झाल्याची घटना वाऱ्यासारखी पसरली आहे. सातपुर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकचा तपास केला जात आहे. नाशिक पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी याबाबत आरोपींचा शोध सुरू केला आहे. क्षुल्लक कारणावरून झालेली हत्या नाशिक शहरात चर्चेचा विषय ठरत असली तरी दुसरीकडे सलग दोन खुनाच्या घटनांनी शहरातील नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Previous Post

अभिनेत्री शर्लिनच्या तक्रारीवरून राखी सावंतला अटक !

Next Post

शिंदे गटाच्या युवती तालुका प्रमुखपदी प्रिया इंगळे !

Next Post
शिंदे गटाच्या युवती तालुका प्रमुखपदी प्रिया इंगळे !

शिंदे गटाच्या युवती तालुका प्रमुखपदी प्रिया इंगळे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group