Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात पोलीस स्थानकाजवळ सुरक्षारक्षकाची आत्महत्या की घातपात?
    क्राईम

    जळगावात पोलीस स्थानकाजवळ सुरक्षारक्षकाची आत्महत्या की घातपात?

    editor deskBy editor deskJanuary 19, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका बंद कंपनीत गुरुवारी सकाळी ६६ वर्षीय सुरक्षारक्षकाचा मृतदेह जळताना आढळून आला. घटनास्थळी पोलीस अधिकारी व कर्मचारी पोहचले असून घातपात की अपघात असा तपास सुरू आहे.

    मिळालेली माहिती अशी कि, एमआयडीसी हद्दीत असलेल्या राम नगरात ईश्वर देवराम अहिरे वय-६६ हे परिवारासह वास्तव्यास आहेत. अहिरे हे सुरक्षारक्षक म्हणून काम करून उदरनिर्वाह करतात. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या जवळ समोरील बाजूस असलेल्या विक्रम प्लास्टिक यांच्या बंद कंपनीत गुरुवारी सकाळी सुरक्षारक्षक म्हणून रात्री काम करून परतलेले काशिनाथ मराठे यांनी गेट उघडताच त्यांना काहीतरी जळत असल्याचे दिसून आले. त्यांनी पाहिले असता एक इसम जळत असल्याचे समजले. मराठे यांनी लागलीच एमआयडीसी पोलिसांना कळविले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे हे पथकासह पोहचले आहेत. एमआयडीसी पोलिसात शुभम लालसिंग ठाकूर वय-३० यांनी खबर दिली आहे. अहिरे यांचा घातपात झाला की त्यांनी आत्महत्या केली अशा आशयाने तपास सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.