Author: user

चाळीसगाव प्रतिनिधी । सामाईक शेतात पाईप जोडण्याच्या कारणावरून वयोवृध्दाला शिवीगाळ करत बांबुने डोळ्याजवळ मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना २५ मे रोजी सकाळी १० वाजता चाळीसगाव तालुक्यातील वाघळी शिवारातील शेतात घडली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक असे की, सिताराम दोधा बारसे वय ७८ रा. हिंगोणे खुर्द ता. चाळीसगाव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्याची वाघळी शिवारातील शेत गट क्रमांक ३९३ मध्ये वडीलोपार्जीत शेती आहे. या शेतात सामाईक पाईपलाईन लावण्यात आले आहे. २५ मे रोजी सकाळी १० वाजता शेतात सामाईक पाईप लाईन जोडण्यावरून सिताराम बोरसे यांना…

Read More

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ शहरातील जुना सातारा परिसरात बुधवारी २९ मे रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास चारचाकीने जात असलेल्या माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांच्यावर हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार करून हत्या करण्यात आली होती. खुनातील प्रमुख आरोपी करण पथरोड याला नाशिक पोलिसांनी शुक्रवारी ३० मे रोजी रात्री १० वाजता द्वारका नगरातून अटक केली आहे. याबाबत भुसावळ शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी २९ मे २०२४ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास भुसावलातील जुना सातारा परिसरातल्या मरिमाता मंदिराच्या समोर माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांच्यावर टोळक्याने अंधाधुंद गोळीबार केला…

Read More

जळगाव प्रतिनिधी । राजा ट्रॅक्टरचे मालक राजा मयूर उर्फ राजेंद्र अनिल मयूर यांच्या बंगल्यावर काम करणाऱ्यानेच इतर सहकाऱ्यांच्या मदतीने गुंगीचे औषध सरबत मध्ये ठाकून दरोडा टाकल्याची घटना मध्यरात्री घडली आहे. घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले असून पुढील चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, जळगाव शहरातील दुध फेडरेशन परिसरात राजा मयूर हे आपल्या पत्नी शैला मयूर यांच्यासोबत वास्तव्याला आहे. त्यांच्या बंगल्यावर दोन सुरक्षा रक्षक आणि घरातील काम करणारा गोपाळ नेपाळी हा कामाला आहे. गोपाळ नेपाळी याने भावाला मुलगा झाला आहे असे सांगून गुरूवारी ३० मे रोजी रात्री १०.३० वाजता बंगल्यावर असलेले दोन सुरक्षा रक्षकांना गुंगीचे औषध टाकून सरबत…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षाच्या वतीने २ अनोळखी इसमांचे नातेवाईक मिळून न आल्याने मानवतेच्या दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजीनगर येथे स्मशानभूमीमध्ये दहन करण्यात आले. या वेळेला सर्व धार्मिक विधी देखील करण्यात आला. मागील आठवड्यात अनेक अनोळखी इसमांचा मृत्यू झाला होता. या मृत्यू मागे उष्माघाताची शक्यता वर्तवली जात आहे. अनोळखी मृतदेहांचे कुठल्याही प्रकारे ओळख पटलेली नव्हती. अखेर त्यांचा अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. अशा वेळेला अनोळखी इसमाच्या मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी कोणीच पुढे येत नसताना गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला. कक्षाच्या वतीने आरोग्यदूत शिवाजी रामदास पाटील यांनी बेवारस मृतदेहांचे अंत्यसंस्कार करणारे इसाक बागवान यांच्यासह सोपान महाजन, निवास…

Read More

अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर शहरातील पैलास पोलीस चौकीसमोरून मालवाहू वाहनातून दाटीवाटीने कोंबून गुरांची निर्दयतेने वाहतूक करणाऱ्या दोघांवर अमळनेर पोलीसांनी बुधवार २९ मे रोजी दुपारी ३ वाजता कारवाई केली आहे. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अमळनेर शहरातील पैलास पोलीस चौकातून मालवाहू वाहतून दोन बैल व २ म्हशीचे पारडून यांची दाटीवाटीने कोंबून निर्दयतेने वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल नंदवाळकर यांना मिळाली. त्यानुसार पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. पथकाने बुधवारी २९ मे रोजी दुपारी ३ वाजता कारवाई करत मालवाहू वाहन क्रमांक (एमएच १२ क्यूजी ९४९८) पकडले. यात दोन बैल व दोन…

Read More

चाळीसगाव प्रतिनिधी । गिरणा नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या तरूणाचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. त्याचा मृतदेह पाण्यात तरंगतांना आढळून आला. याप्रकरणी मेहुणबारे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ओम विजय चव्हाण वय १८ रा. हिसवड ता. मालेगाव असे मयत तरूणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड गावाजवळ उपखेड आश्रम शाळेत ओम चव्हाण हा तरूण वास्तव्याला होता. दरम्यान आश्रम शाळेच्याजवळ गिरणा नदी पात्र आहे. मंगळवारी २८ मे रोजी दुपारी ४.३० वाजता ओम चव्हाण हा पोहण्यासाठी गिरणा नदी पात्रात गेला होता. त्यानंतर त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. त्याचे शोधकार्य सुरू…

Read More

मुंबई प्रतिनिधी । मुंबईतील जया शेट्टी हत्याकांड प्रकरणी कुविख्यात डॉन छोटा राजन याला दोषी ठरविण्यात आले आहे. त्याला मकोका अंतर्गत न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा आणि १६ लाख रूपयांचा दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणातील अन्य आरोपींना यापूर्वीच जन्मठेपेची शिक्षा झाली होती. हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्या ४ मे २००१ रोजी झाली होती. जया शेट्टी यांनी खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे ग्रँट रोडमधील गोल्डन क्राऊन हॉटेलमध्ये राजनच्या हस्तकांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. राजन गँगने रवी पुजारीमार्फत जया शेट्टीकडून ५० कोटींची खंडणी मागितली होती. या प्रकरणातील अन्य आरोपी अजय मोहिते, प्रमोद धोंडे आणि राहुल पावसरे यांना २०१३ मध्येच न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची…

Read More

नवी दिल्ली वृत्तसेवा । केरळ राज्यात नैऋत्य मान्सून दाखल झाला असून केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील अनेक भागात चांगला पाऊस झाला. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. आज ३० मे रोजी तो ईशान्य भारताच्या बहुतांश भागांकडे सरकणार असल्याची सांगण्यात आले आहे. देशाच्या उत्तर आणि मध्य भागातील लोक उष्णतेनं त्रस्त आहेत. बुधवारी ३० मे रोजी अनेक भागांत विक्रमी उष्णतेची नोंद झाली. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार आता उष्णतेला ब्रेक लागणार आहे. आजपासून उष्णतेचा प्रभाव हळूहळू कमी होण्यास सुरुवात होईल. केरळमध्ये दाखल झालेला मान्सून उत्तर-पूर्व राज्यांकडे सरकण्याचे संकेत आहेत. या ठिकाणी पावसाची शक्यता: ईशान्य आसाम आणि त्याच्या लगतच्या भागात खालच्या आणि मध्य…

Read More

जळगाव प्रतिनिधी । चहा व सिगरेटचे पैसे मागितल्याच्या रागातून चहाविक्रेत्या महिलेला दोन जणांनी लोटगाडी उलटी करून नुकसान करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना एमआयडीसीतील वैष्णिवी पॉलीमर कंपनीजवळ बुधवारी २९ मे रोजी मध्यरात्री १२.३० वाजता घडली. याप्रकरणी पहाटे ३ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसीतील व्ही सेक्टरमधील वैष्णिवी पॉलीमर कंपनीजवळ सारीका राजेश वसाणे वय-४० या महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. चहा टपरी चालवून त्या आपला उदरनिर्वाह करतात. कंपनीच्या समोरच त्यांची चहाची टपरी आहे. बुधवारी २९ मे रोजी रात्री १२.३० वाजता महिला ही टपरीवर असतांना करण पाटील आणि चेतन माळी यांनी महिलेच्या टपरीवर…

Read More

धरणगाव प्रतिनिधी । गेल्या अनेक वर्षानंतर यंदा भीषण दुष्काळाला धरणगाव तालुक्यातील नागरीकांना सामोरे जावे लागत आहे. याकडे जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांचे दुर्लक्ष झाले असून शिवसेना उबाठाच्या वतीने वेळोवेळी आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले आहे. शासनाने धरणगाव तालुका दुष्काळ जाहीर करावा, व शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याच्या मागणीसाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे धरणगाव तहसील कार्यालयात येवून तहसीलदार महेंद्र सुर्यवंशी व तालुका कृषी आधिकारी चंद्रकांत देशमाने यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासन धरणगाव तालुक्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. दुष्काळासारखी परिस्थीत असतांना कोणत्याही स्वरूपाच्या उपाययोजन केल्या जात नाही. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणे, जनावरांना चारा छावण्या लावणे, सहकारी कर्जाचे पुर्नगठण…

Read More