जळगाव- प्रतिनिधी । भुसावळहून जळगावला येणाऱ्या बसमधून दोन प्रवाशांचे मोबाईल चोरीला गेल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली होती. दरम्यान, जिल्हापेठ पोलिसांनी बस स्थानकात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या मुजीबुर रहमान मोहम्मद इस्माईल (वय २५, रा. गुलशन नगर, मालेगाव, ता. नाशिक) याच्या चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून चोरलेले दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले. याबाबत अधिक असे की, जळगाव शहरातील विठ्ठल पेठ येथील राहणारे सुरज संजय बारी हे रेल्वेत हेल्पर म्हणून नोकरीस आहे. शनिवार १ जून रोजी ते भुसावळ येथून जळगाव येथे बसने आले. दुपारी १२ वाजता नवीन बसस्थानक येथे ते बसमधून उतरले असता, त्यांना पॅन्टच्या खिशातून मोबाईल चोरीस गेल्याचे लक्षात आले. दरम्यान, याच बसमधील संतोष…
Author: user
मुंबई वृत्तसेवा । मान्सून केरळमध्ये दोन दिवस आधीच दाखल झाला आहे. मान्सून दाखल होण्याच्या बातमीमुळे कडक उन्हाचा सामना करणाऱ्या नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. सलग चार दिवसांपासून विदर्भात तापमान ४५ अंशांवर आहे. आता मान्सून केरळमध्ये पोहचल्यानंतर महाराष्ट्रातील लोकांना मान्सूनचे वेध लागले आहे. मंगळवारी ४ जून पर्यंत मान्सून कोकणात होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचण्यास आठ ते दहा दिवस लागतात. म्हणजेच ८ ते १० तारखेपर्यंत मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागांत मान्सून दाखल होणार आहे. बंगालच्या उपसागरात रेमल या चक्रीवादळामुळे मान्सून सक्रीय झाला आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर पुढील वाटचाल दमदार सुरु आहे. मान्सूनच्या अरबी समुद्र आणि बंगालच्या…
जळगाव प्रतिनिधी । पैसे गुंतवणूक करून अधिकचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत शिरसोली येथील तरूणाची ५ लाख २० हजारांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना बुधवारी २९ मे रोजी उघडकीला आले आहे. याप्रकरणी १ जून रोजी दुपारी २ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन टेलीग्राम धारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक असे की, जळगाव तालुक्यातील शिरसोली गावात शुभम दिलील लांबोळे वय २७ हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २८ आणि २९ मे रोजी टेलीग्राम धारक असलेले प्रिया शर्मा आणि दिव्या बस्सी असे नाव सांगणाऱ्या दोन जणांनी शुभमशी संपर्क साधला. त्याला गुंतवणक करून अधिकचा पैसे मिळवून देण्याचे सांगून त्याचा विश्वास…
जळगाव प्रतिनिधी । विनापरवाना गुरांची वाहतूक करणारा ट्रक महाराणा प्रताप पुतळ्याजवळ पोलीसांनी पाठलग करून पकडल्याची घटना शनिवारी १ जून रोजी पहाटे सव्वा पाच वाजेच्या सुमारास घडली आहे. यात गुरांना निर्दयीपणे कोंबून त्याची वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिरोज खान अय्युब खान (रा. सानेगुरुजी वसाहत, चोपडा) व मुद्दसर मुख्तार सैय्यद (रा. चोपडा) असे वाहन चालक व मालक यांची नावे आहेत. चोपडा येथून जळगावकडे कत्तलीसाठी गो- वंशाची वाहतुक करणारा आयशर जात असल्याची माहिती शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास उदय सुभाष पाटील (रा. विठ्ठपेठ, पाटीवाडा, असोदा) याला मिळाली. त्याने लागलीच जळगावातील कुलदीप पाटील, वैभव…
जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील टॉवर चौकात दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीसह मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी ३१ मे रोजी सायंकाळी ६ वाजता घडली आहे. याप्रकरणी शनिवारी १ जून रोजी दुपारी २ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अजहर बेग इसा बेग मिर्झा वय ३६ रा. सय्यद वाडा भडगाव ह. मु. उस्मानिया पार्क शिवाजी नगर, जळगाव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शुक्रवारी ३१ मे रोजी सायंकाळी ६ वाजता अजहर बेग हे त्यांच्या पत्नी व मुलगा उमर अजहर बेग मिर्झा यांच्यासोबत दुचाकीने शिवाजी नगरातून गांधी उद्यानाकडे…
भुसावळ प्रतिनिधी | शहरातील मॉडर्न रोडवर काहीही कारण नसताना दोन बहिणींना शिवीगाळ करत मारहाण करून मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. याप्रकरणी दुपारी ३ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी की, सरोज राजेंद्र बालशंकर वय-२३, रा.कीन्ही ता. भुसावळ ही तरुणी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. या दोन्ही बहिणी कामाच्या निमित्ताने शुक्रवार ३१ मे रोजी दुपारी १ वाजता भुसावळ शहरातील मॉडर्न रोडवर झालेल्या होत्या. त्यावेळी शाहरुख शेखलाल गवळी वय-२९, रा. कन्हाळा ता. भुसावळ याने दोघांना काही कारण नसताना शिवीगाळ केली. तसेच चापटाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी दुपारी ३ वाजता भुसावळ बाजारपेठ…
चाळीसगाव प्रतिनिधी | तालुक्यातील हिंगोली गावाजवळून आयशर ट्रक मधून बेकायदेशीररित्या आणि निर्दीपणे गुरांची वाहतूक करणारे २ ट्रकवर चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी ३१ मे रोजी पहाटे साडेपाच वाजता कारवाई केली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील हिंगोली गावाजवळून आयशर ट्रक क्रमांक (एमपी १२ एच ६३२) आणि (एमपी १२ एच २७९३) या ट्रक मधून गुरांची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी ३१ मे रोजी पहाटे ५.३० वाजता कारवाई केली. त्यावेळी दोन्ही वाहने अडवून यामध्ये निर्दयपणे कोंबून गुरांची वाहतूक होत असल्याचे…
जळगाव प्रतिनिधी | तालुक्यातील वावडदा ते म्हसावद रस्त्यावर भरधाव वेगाने अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत वाकोद येथील तरुणाचा दुचाकीस्वार ठार झाला असून एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी १ जून रोजी दुपारी १.३० वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु होते. पवन वैजनाथ मंगरुळे (वय-२५, रा. वाकोद ता. जामनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो वाकोद गावात हातमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. त्याच्या पश्चात आई, २ बहिणी असा परिवार आहे. गावातील राहुल उर्फ शुभम लक्ष्मण सोनवणे (वय २५, रा. वाकोद ता. जामनेर) या तरुणासह पवन मंगरुळे हा शनिवारी १ जून रोजी ५ वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील…
अमळनेर प्रतिनिधी |अमळनेर तालुक्यातील गांधलीपुरा येथे २३ वर्षीय महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले. श्रद्धा गौरव वाघ वय-२३, रा. गांधीपुरा, ता. अमळनेर असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील गांधलीपुरा येथे श्रद्धा वाघ या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला होत्या. दरम्यान ३१ मे रोजी सकाळी त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना तातडीने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा दुपारी १ वाजता मृत्यू झाला. दरम्यान वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती उष्माघाताने मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणी दुपारी ३ वाजता अमळनेर पोलीस…
रावेर प्रतिनिधी | रावेर शहरातील एका भागात ३ वर्षाच्या मुलीचा गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी सावत्र बापासह सख्ख्या आईला अटक केली आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे . खूनामागील कारण समजू शकले नसून पोलीस त्यादृष्टीने तपास करीत आहेत. माधुरी घेटे व अजय घेटे अशी अटक केलेल्या मुलीच्या आई वडिलांचे नाव आहे. खूनाचे कारण पोलीस तपासात निष्पन्न होण्याची शक्यता आहे. बेलसवाडी ता मुक्ताईनगर येथील रहिवासी माधुरीचा वारोली येथील भारत मसाने याच्याशी २०१७ मध्ये विवाह झाला होता. माधुरीला पहिल्या पतीपासून ५ वर्षाचा मुलगा पियुष व ३ वर्षाची मुलगी आकांक्षा आहे. मात्र पतीशी पटत नसल्याने माधुरी दोन्ही…

