राज्यातील अनेक जिल्ह्यात आज ग्रामपंचायत निवडणूकिमध्ये मतदान सुरू आहे तर धरणगाव तालुक्यात देखील ग्रामपंचायत निवडणूक मतदान सुरू असताना अनेक गावात तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी हे जात असताना एका रस्त्यावर त्यांची चार चाकी शासकीय गाडी अचानक बंद पडल्याने मोठी तारांबळ उडाली होती त्यानंतर त्यांनी मिळेल त्या वाहनाने आपले कर्तव्य बजावण्यासाठी पुढे सरसावले होते. धरणगाव तालुक्यातील अनेक गावात आज ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान मोठ्या उत्साहात सुरू असताना धरणगाव तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी आज सकाळपासून अनेक गावात भेटी देत असताना एका रस्त्यावर त्यांच्या शासकीय गाडी अचानक बंद पडली त्यामुळे पुढे जाण्यास विलंब होत असल्याने त्यांनी मिळेल ती गाडी घेत आपले कर्तव्य बजावण्यासाठी पुढील गावात मतदान…
Author: Team Live Maharashtra News
दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. आजचे सर्व बारा राशींचे भविष्य जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. मेष रास मेष राशींच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र पद्धतीचा असणार आहे. . विद्यार्थ्यांनी शिक्षकाचा आदर केला पाहिजे. आरोग्य चांगले राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वृषभ रास वृषभ राशींच्या मंडळींना आजचा दिवस हा आनंदाचा असेल. आज आत्मविश्वास वाढून नोकरीत आपले वर्चस्व प्रस्थापित कराल. आरोग्य चांगले राहील. मिथुन रास मिथुन राशींच्या लोकांना आजचा दिवस अनुकूल असणार आहे. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. व्यावसायिकांनी केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. कर्क रास कर्क…
साहित्य मैदा, बारीक चिरलेली मेथी, धनेपुड, जिरे पावडर, लाल तिखट, हळद, धनेपूड, तेल, ओवा, मीठ कृती सर्वप्रथम एका भांड्यामध्ये प्रमाणानुसार मैदा घ्या. त्यात बारीक स्वच्छ पाण्याने धुतलेली आणि बारीक चिरलेली मेथी टाका. त्यानंतर त्यात लाल तिखट, हळद, धनेपूड आणि जिरे पावडर टाका. त्यात थोडा ओवा टाका. चवीनुसार मीठ टाका. मिश्रणाच्या प्रमाणानुसार थोडे तेल टाका. सर्व मिश्रण एकत्र करा आणि पाण्याने मळून घ्या. या मळलेल्या पीठावर मैदा टाकून लाटून घ्या आणि शंकरपाळे सारखे काप पाडा. कढईत तेल गरम करा आणि हे मेथीचे शंकरपाळे मंद आचेवर तळून घ्या. मेथीचे शंकरपाळे तयार होईल.
दिवाळीच्या आगमनाची चाहूल लागली असतानाच नोव्हेंबर मध्ये अवकाशातही खगोलीय घटनांनी जणू दिवाळी साजरी होणार आहे. या महिन्यात घडणाऱ्या खगोलीय घटना गुरु पृथ्वीजवळ येत असून तेजस्वी दिसणार आहेत. त्याचप्रमाणे पहाटे शुक्र अधिक तेजस्वी दिसेल. चंद्राची शुक्र शनि आणि बुध ग्रहांची युती होणार आहे. दोन उल्का वर्षाव आणि धुमकेतू दिसणार आहेत या अनोख्या सुवर्णसंधीचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. दि. 3 नोव्हेंबरला गुरु पृथ्वी जवळ येत आहे. संपूर्ण महिन्यात पूर्वेला संध्याकाळी साध्या डोळ्यांनी सर्वाधिक तेजस्वी दिसणार आहे. नऊ नोव्हेंबरला पहाटे पूर्वीला शुक्र आणि चंद्राची युती दिसेल. त्याचप्रमाणे दि 10 नोव्हेंबरला सी 2023 जवळ येणार असून तो दुर्बिणींने दिसणार आहे.…
दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. आजचे सर्व बारा राशींचे भविष्य जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. मेष रास मेष राशींच्या लोकांना आजचा दिवस चांगला असणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना यश मिळेल त्यामुळे आर्थिक परिस्थितीत बदल होतील. आरोग्य चांगले राहील. वृषभ रास वृषभ राशींच्या मंडळींना आजचा दिवस अनुकूल असेल. तुमची सर्व बिघडलेली कामे पूर्ण होऊ लागतील. कुटुंबासोबत फिरायला जाल. परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. आरोग्य चांगले राहील. मिथुन रास मिथुन राशींच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र पद्दतीचा असणार आहे. आज तुमची कोणी खास भेट होईल. व्यावसायिकांसाठी…
राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सुरू मनोज जरांगे पाटील गेल्या आठ दिवसापासून उपोषणाला बसले होते. आज राज्य सरकारच्या शिष्टमडळांशी संवाद साधल्यानंतर व शासनाकडून काही आश्वासन दिल्या गेल्यानंतर मनोज जरांगे यांनी त्यांचे उपोषण नवव्या दिवशी मागे घेतले आहे. तर २ जानेवारी 2024 पर्यंत सरकारला त्यांनी वेळ वाढवून दिला आहे. त्यानंतर जर सरकारने शब्द पाळला नाही तर पुढील लढाई ही मुंबईत असेल, आमचा मोर्चा मुंबईच्या दिशेने जाईल, असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला. शिंदे समितीने दोन महिन्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र वाटायला सुरवात करावी. नात्यातील सर्व व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यात यावीत. सरकारला दोन महिन्यांचा वेळ…
साहित्य ज्वारी, लसूण, खोबरे, कोथिंबीर, तेल, मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, मुग डाळ, तुरीची डाळ, तूप, पाणी कृती सर्वप्रथम, ज्वारी सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्या आणि पाण्यात अर्ध्या तासासाठी भिजू घाला. ज्वारीतील पाणी काढून टाका आणि ज्वारी मिक्सरमधून पाणी न टाकता बारीक करा ज्यामुळे ज्वारीचा भरडा होईल. लसूण, खोबरे आणि कोथिंबीर एकत्र करा आणि मिक्सरमधून बारीक करा. यानंतर कुकरमध्ये तेल गरम करून घ्या. गरम तेलात मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता टाका. त्यात बारीक चिरलेला कांदा टाका आणि परतून घ्या. त्यात हळद घाला आणि चवीनुसार हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे घाला. लसूण, खोबरे आणि कोथिंबीरचे बारीक केलेले मिश्रण यात टाका आणि…
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पूर्णाकृती ब्राँझच्या पुतळ्याचे बुधवारी वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अमोल काळे यांनी अनावरण केले. या कार्यक्रमानंतर सचिन तेंडुलकरने वानखेडे स्टेडियम वरील आपल्या पहिल्या भेटीची मजेशीर आठवणी सांगितली. मी दहा वर्षांचा असताना पहिल्यांदा वानखेडे स्टेडियमवर आलो होतो आणि तेव्हा मला लपवून ठेवण्यात आले होते अशी आठवण सचिनने सांगितली सचिनने एप्रिल मध्ये वयाचे अर्धशतक पूर्ण केले त्याचा सन्मान करण्यासाठी एमसीएने वानखेडे स्टेडियम पूर्णाकृती पुतळा स्थापन केला. यावेळी सचिनच्या कुटुंबीयांसह क्रीडामंत्री संजय बनसोडे आयसीसी व बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार अध्यक्ष उपाध्यक्ष राजीव शुक्ला सचिव जयेशाह खजिनदार आशिष शेलार आणि एमसीएचे सर्व पदाधिकारी उपस्थित…
सणासुदीचे दिवस सुरु असून यंदा दिवाळी पूर्वीच एक दिलासदायक बातमी समोर येतेय. तर सोने चांदीच्या भावात चढ-उतार सुरू असून बुधवारी चांदीच्या भावात १ हजार ४०० रुपयांनी घसरण होऊन ती ७१ हजार ६०० सहाशे रुपये प्रति किलो वर आली. तर सोन्याच्याही भावात बुधवारी 300 रुपयांची घसरण होऊन ते 61 हजार 300 रुपये प्रति तोळ्यावर आले आहे. चार दिवसांपूर्वी सोन्याच्या भावात वाढ होऊन ते 62 हजार दोनशे रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले होते. त्यानंतर 61 हजार 300 रुपये प्रति तोळ्यावरती आली आहे. अशाच प्रकारे गेल्या आठवड्यातही 73 हजार पाचशे रुपयांवर गेलेल्या चांदीच्या भावात २६ ऑक्टोबर रोजी एक हजार रुपयांची घसरण झाली. 31 ऑक्टोबरला…
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येतेय. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार इयत्ता बारावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत तर इयत्ता दहावीची परीक्षा एक ते 26 मार्च या कालावधीत होणार आहेत. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक या मंडळाच्या www.mahasscboard.in या संकेतस्थळावर पाहता येईल अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी बुधवारी जाहीर केली. इयत्ता बारावी सर्वसाधारण व्यवसाय व द्विलक्षी अभ्यासक्रम 21 फेब्रुवारी ते 19 मार्च. माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान…

