Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नास्त्याच्या पैशांवरून हॉटेलमधील साहित्याची तोडफोड
    क्राईम

    नास्त्याच्या पैशांवरून हॉटेलमधील साहित्याची तोडफोड

    userBy userJune 10, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । टॉवर चौकातील हॉटेल जोगळेकर येथे नाश्त्याचे पैसे मागितल्याचा राग आल्याने दारुच्या नशेत असलेल्या दोघांनी हॉटेलमधील साहित्याची तोडफोड करीत नुकसान केल्याची घटना रविवारी ९ रोजी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता दोघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    शहरताील नवीपेठ परिसरात हॉटेल जोगळेकर येथे विजय काशीनाथ रावकर हे मॅनेजर म्हणून नोकरीस आहेत. रविवारी ९ रोजी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास अजय जगताप व प्रवीण शिंदे हे दारु पिवून हॉटेलमध्ये आले. त्यांनी नाश्त्याचे पार्सल घेतल्यानंतर पैसे न देता त्यांनी मालक मयुर व्यास यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. परंतून तक्रार दिल्यानंतर मयुर व्यास व पोलीस हे त्याठिकाणी काही होवू नये, म्हणून त्यांच्यासोबत गेले. मात्र त्यापुर्वीच अजय जगताप व प्रवीण शिंदे हे पुन्हा पावणेचार वाजेच्या सुमारास हॉटेलमध्ये आले. त्यांनी सोबत आणलेल्या लाकडी दांडक्याने हॉटेलच्या काऊंटरवर मारुन तोडफोड केली. तसेच दांडका कढईवर मारल्यामुळे तेल खाली पडले. यामध्ये हॉटेलमधील कारागीर वैजनाथ शिंदे हे जखमी झाले. तसेच दुकानातील नाश्त्याचे पदार्थ खराब झाले असून व्यास यांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता मॅनेजरने दिलेल्या तक्रारीवरुन अजय जगताप व प्रवीण शिंदे यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ पंकज सपकाळे हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    user
    • Website

    Related Posts

    ४०० कोटींच्या कथित रोख चोरी प्रकरणात अपहरणाचा धक्कादायक प्रकार उघड

    January 24, 2026

    मुंब्रा विजय भाषणातील वक्तव्यावरून वाद; सहार शेख यांचा खुलासा व माफी

    January 24, 2026

    फॉरेन्सिक अहवालातून धागेदोरे; अभिनेता केआरके गोळीबार प्रकरणात ताब्यात

    January 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.