Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भीषण अपघातात दुचाकीस्वार ठार, एक गंभीर
    क्राईम

    भीषण अपघातात दुचाकीस्वार ठार, एक गंभीर

    userBy userJune 2, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी | तालुक्यातील वावडदा ते म्हसावद रस्त्यावर भरधाव वेगाने अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत वाकोद येथील तरुणाचा दुचाकीस्वार ठार झाला असून एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी १ जून रोजी दुपारी १.३० वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु होते.

    पवन वैजनाथ मंगरुळे (वय-२५, रा. वाकोद ता. जामनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो वाकोद गावात हातमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. त्याच्या पश्चात आई, २ बहिणी असा परिवार आहे. गावातील राहुल उर्फ शुभम लक्ष्मण सोनवणे (वय २५, रा. वाकोद ता. जामनेर) या तरुणासह पवन मंगरुळे हा शनिवारी १ जून रोजी ५ वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील वावडदा येथून जळगावी जात होता. म्हसावद गावाच्या पुढे भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

    यात दोघेही तरुण रस्त्यावर फेकले गेले. यात पवन मंगरुळे हा जागीच ठार झाला. तर राहुल उर्फ शुभम हा गंभीर जखमी झाला आहे. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. तेथे प्रथमोपचार झाल्यावर राहुल याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनास्थळी वाकोद गावातील माजी जिल्हा परिषद सदस्य अमित देशमुख यांनी भेट देऊन जखमींना उपचारासाठी जी. एम. फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने दाखल करण्यास मदत केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    user
    • Website

    Related Posts

    जळगावातील गुटखा तस्करीवर पोलिसांची मोठी कारवाई !

    June 10, 2026

    अमळनेरच्या डॉ. सुमित पाटील यांचा लखनऊ येथे अपघातात मृत्यू

    June 10, 2026

    लग्नातील किरकोळ वादाचे हिंसक रूप; दोन गटांत तलवारी व लोखंडी पाईपने हल्ला

    June 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.