Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धक्कादायक : हातात हत्यार घेऊन नसतानाचा व्हिडिओ व्हायरल: चौघांना अटक
    क्राईम

    धक्कादायक : हातात हत्यार घेऊन नसतानाचा व्हिडिओ व्हायरल: चौघांना अटक

    userBy userMay 26, 2024Updated:May 26, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिवाजीनगर हुडको परिसरात राहणाऱ्या तरुणांनी घरात धारदार शस्त्रे घेऊन नाचत व्हिडीओ तयार  केला. व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी तपास केला. त्यानुसार चौघांना अटक करण्यात आली आहे. चौघांकडून २ चॉपर, १ तलवार आणि १ चाकू हस्तगत करण्यात आला आहे.

    शिवाजीनगर हुडको भागात मंदिराजवळ व्हिडीओमधील इसम दिसल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यात  पोलिसांनी दिपक सखाराम बागुल (वय-३२), तुषार संतोष जाधव (वय-२२), मनिष राजेंद्र बि-हाडे (वय-२०), संतोष कडु तायडे (वय-३२, सर्व रा.शिवाजी नगर हुडको) यांना अटक केली आहे.  व्हिडीओमधील तलवार, कोयता, चॉपर हे त्यांनी त्यांचे घरी ठेवलेले पंचासमक्ष काढून दिले.

    कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुनिल पाटील, हवालदार उमेश भांडारकर, किशोर निकुंभ, भास्कर ठाकरे, सुधीर सावळे, योगेश पाटील,  तेजस मराठे यांच्या पथकाने केली आहे.

    शहर पोलीस ठाण्यात अमोल ठाकूर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास उमेश भांडारकर करीत आहे. चौघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    user
    • Website

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.