जळगाव प्रतिनिधी | मित्रांसोबत शेतातील विहिरीत होण्यासाठी गेलेल्या एका 25 वर्षे तरुणाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी 29 जुलै रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली आहे. महेंद्र नारायण पाटील वय-25 रा. लोणवाडी ता.जळगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
जळगाव तालुक्यातील लोणवाडी येथील महेंद्र पाटील हा आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. गुरुवारी 29 जुलै रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास महेंद्र हा त्याच्या मित्रांसोबत लोणवाडी गावातील शेतामध्ये विहिरीत पोहतांना पाण्याचा अंदाज न आल्यान सुमारे ७० फुट खोल असलेल्या विहिरीत दुपारी १:३०च्या सुमारास बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कर्मचारी पो. हे.कॉ.प्रदीप पाटील व पो.हे.कॉ.स्वप्नील पाटील हे घटनास्थळी धाव घेतली.
त्यानंतर तरुणांच्या मदतीने विहिरीतून मृतदेह बाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला आहे या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.