• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मोठी बातमी : कार कापूस व्यापाऱ्याला लुटले; लाखो रूपयांची बॅग घेवून चोरटे पसार

user by user
June 10, 2024
in क्राईम, पारोळा
0
मोठी बातमी : कार कापूस व्यापाऱ्याला लुटले; लाखो रूपयांची बॅग घेवून चोरटे पसार

पारोळा प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील कराडी गावाजवळ रस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या चौघांनी कारला अडवून धुळे येथील व्यापाऱ्याची सुमारे ६ लाख ९५ हजार रुपयाची रोकड लांबवल्याची घटना पारोळा तालुक्यात घडली. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारोळा तालुक्यातील कराडी गावाजवळ धुळे येथील व्यापारी योगेश वाल्मीक पाटील (रा. निमडाळे ता. जि. धुळे) या व्यापाऱ्याने पारोळा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. ते स्वीफ्ट डिझायर कार एमएच ०१ बीटी ८७९६ ने तामसवाडी ता. पारोळा येथे शेतक-याची कापसाची उधारी देण्यासाठी पैसे घेऊन निघाले होते. कराडी गावाचे अलीकडे १ कि.मी अंतरावर दोन विना क्रमांकाचे दुचाकीवरील ४ इसमांनी कारचे पुढील बाजुस व मागून येऊन कार अडवून चावी काढून घेतली.

नंतर त्यांनी, फिर्यादीला “चुपचाप बैठनेका नही तो मार डालेगे” असे हिंदी भाषेत दम देवुन मागील सिटवर ठेवलेले ६ लाख ९५ हजार पांढ-या बॅगेतील रोख रक्कम बळजबरीने काढुन घेवुन बोळे गावाकडे पलायन केले. चारही अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या आदेशाने पोलिस उपनिरीक्षक अमरसिंग बसावे हे तपास करीत आहेत. पोलिसांनी एक विशेष पथक तयार करून धुळ्याकडे रवाना करण्यात आले आहे. तर इतर बीट पोलीस कर्मचाऱ्यांना बोळे, कराडी, तामसवाडी, ढोली, वेल्हाने या परिसरात तपासासाठी पाठवण्यात आले आहे.

Previous Post

भीषण अपघातात वृध्द जागीच ठार; दुचाकीस्वार जखमी; ट्रॅक्टर चालक फरार

Next Post

या लोकांची आध्यात्मिक कार्यात रुची वाढणार !

Next Post
जुन्या समस्येपासून या लोकांना आज मिळणार आराम !

या लोकांची आध्यात्मिक कार्यात रुची वाढणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आजचा दिवस या लोकांसाठी जाणार भरभराटीचा !
राशीभविष्य

घर आणि व्यवसाय या दोन्ही ठिकाणी सुसंवाद राखणे आवश्यक !

July 5, 2025
छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group