Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भीषण अपघातात वृध्द जागीच ठार; दुचाकीस्वार जखमी; ट्रॅक्टर चालक फरार
    क्राईम

    भीषण अपघातात वृध्द जागीच ठार; दुचाकीस्वार जखमी; ट्रॅक्टर चालक फरार

    userBy userJune 10, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रावेर प्रतिनिधी । पातोंडी गावाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला कट मारून झालेल्या अपघातात वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवार ९ जून रोजी सकाळी साडेअकरा वाजता घडली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. चुडामन लहानू भालेराव वय-६० रा. कर्जोत ता. रावेर असे मयत झालेल्या वृद्धाचे नाव आहे.

    या संदर्भात अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील पातोंडी गावाजवळ रविवार ९ जून रोजी सकाळी १०.३० वाजता अजय अशोक शिरतुरे वय-३० रा. विवरा ता.रावेर हा त्याची दुचाकी एमएच १९ इडी ७५९२ निंभोरा सिमकडे जाण्यासाठी निघाला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत चुडामन लहानू भालेराव हे देखील दुचाकीवर मागे बसलेले होते. दरम्यान भरदा वेगाने येणारे ट्रॅक्टर क्रमांक (एमएच २९ आर ८९०२) ने जोरदार येऊन कट मारला. या अपघातात दुचाकीवरील दोघे खाली पडले. तर या अपघातामध्ये चुडामन भालेराव यांचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीस्वार अजय शिरतुरे हा किरकोळ जखमी झाला असून थोडक्यात बचावला आहे. दरम्यान याप्रकरणी दुपारी ३ वाजता रावेर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार ट्रॅक्टर चालक शेख अलीम शेख सलीम रा. मदिना कॉलनी रावेर याच्या विरोधात रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक प्रिया वसावे हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    user
    • Website

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.