Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धावत्या रेल्वेच्या धक्क्याने अनोळखी तरूणाचा मृत्यू; ओळख पटविण्याचे आवाहन
    अमळनेर

    धावत्या रेल्वेच्या धक्क्याने अनोळखी तरूणाचा मृत्यू; ओळख पटविण्याचे आवाहन

    userBy userJune 10, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील पडसे गावाजवळ धावत्या रेल्वेच्या धक्का लागल्याने एका अनोळखी अंदाजे ३५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवार ९ जून रोजी सकाळी ८ वाजता सुमारास उघडकीला आले आहे. याबाबत दुपारी १ वाजता मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

    या संदर्भात अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील पडसे गावाजवळ असलेल्या रेल्वे रुळावरील रेल्वे खंबा क्रमांक ३३४ आणि २३४ च्या मध्ये असलेल्या रेल्वे रुळात एका अनोळखी अंदाजे ३५ वर्षे तरुणाचा मृतदेह आढळून आला. दरम्यान कोणत्यातरी धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने तरूणाचा त्याचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या संदर्भात लोको पायलट यांनी मारवड पोलिसात या घटनेबाबत खबर दिली. त्यानुसार मारवड पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल शरीफ खान पठाण खान यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. दरम्यान या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात दुपारी १२ वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ शरीफ खान पठाण हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    user
    • Website

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.