जळगाव प्रतिनिधी । विनापरवाना गुरांची वाहतूक करणारा ट्रक महाराणा प्रताप पुतळ्याजवळ पोलीसांनी पाठलग करून पकडल्याची घटना शनिवारी १ जून रोजी पहाटे सव्वा पाच वाजेच्या सुमारास घडली आहे. यात गुरांना निर्दयीपणे कोंबून त्याची वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिरोज खान अय्युब खान (रा. सानेगुरुजी वसाहत, चोपडा) व मुद्दसर मुख्तार सैय्यद (रा. चोपडा) असे वाहन चालक व मालक यांची नावे आहेत.
चोपडा येथून जळगावकडे कत्तलीसाठी गो- वंशाची वाहतुक करणारा आयशर जात असल्याची माहिती शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास उदय सुभाष पाटील (रा. विठ्ठपेठ, पाटीवाडा, असोदा) याला मिळाली. त्याने लागलीच जळगावातील कुलदीप पाटील, वैभव चौधरी, निलेश वाणी, कुणाल सोनार यांना त्याची माहिती दिली. त्यानंतर (एमएच ०४, जेके ४८७४) क्रमांकाचा आयशर ट्रक हा आव्हाणे गावात थांबविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र चालकाने तो थांबवला नाही. त्यामुळे तरुणांनी त्या ट्रकचा पाठलाग केला. दरम्यान, पावणेपाच वाजेच्या सुमारास तरुणांनी हा ट्रक काही नागरिकांच्या मदतीने प्रभात चौकातील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याजवळ थांबवला. त्यांनी वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये गो-वंश कांेबलेले होते. यावेळी त्याठिकाणी जमलेल्या काही जणांनी वाहनाच्या काचा फोडल्या. दरम्यान, काही वेळातच त्याठिकणी पोलीस आल्याने त्यांनी ट्रक चालक फिरोज खान अय्युब खान याला ताब्यात घेतले. त्यानंतर वाहनातील गोवंश हे बाफना गोशाळेत जमा केले.कत्तलीसाठी घेवून जाणाऱ्या आयशर वाहनात २४ गोऱ्हे आणि बैल अत्यंत निर्दयीपणे कोंबलेले दिसून आले. दरम्यान, हे बघताच त्याठिकाणी उपस्थित असलेल्या काही जणांनी वाहनाच्या काचा फोडल्या. याप्रकरणी अखेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.