भुसावळ प्रतिनिधी | शहरातील मॉडर्न रोडवर काहीही कारण नसताना दोन बहिणींना शिवीगाळ करत मारहाण करून मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. याप्रकरणी दुपारी ३ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, सरोज राजेंद्र बालशंकर वय-२३, रा.कीन्ही ता. भुसावळ ही तरुणी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. या दोन्ही बहिणी कामाच्या निमित्ताने शुक्रवार ३१ मे रोजी दुपारी १ वाजता भुसावळ शहरातील मॉडर्न रोडवर झालेल्या होत्या. त्यावेळी शाहरुख शेखलाल गवळी वय-२९, रा. कन्हाळा ता. भुसावळ याने दोघांना काही कारण नसताना शिवीगाळ केली. तसेच चापटाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी दुपारी ३ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी करीत आहे.