इंदौर वृत्तसेवा । अंगावर लष्काराचा गणवेश व हातात तिरंगा घेवून मॉ तुझे सलाम चं गाणं म्हणतांना माजी सैनिकाचा मंचावर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. दरम्यान हा अभिनय करतांना ते खाली कोसळले असतांना उपस्थितांना टाळ्या वाजविल्या, परंतू माजी सैनिकाने जगाचा निरोप घेतला होता.
इंदौरच्या फुटी कोठी येथील ही घटना आहे. योग क्षेत्रात काम करणाऱ्या एका संस्थेच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात माजी सैनिक बलजीत हे आपल्या टीम सोबत आले होते. त्यांना या कार्यक्रमात सादरीकरण करत असतांना तिथे देशभक्तीपर गीत सादर केले. त्यानंतर मेरी आन तिरंगा है, वंदे मातरम.. आदी गाण्यांवर अनेकांनी परफॉर्मन्स दिला. बलजीत यांनी या कार्यक्रमात भाग घेतला. लष्कराच्या गणवेशातच ते स्टेजवर जोशात अवतरले होते.
यावेळी त्यांनी माँ तुझे सलाम हे गीत गाण्यास सुरुवात केली. त्यांच्या गाण्याला प्रचंड प्रतिसाद मिळत होता. हातात तिरंगा घेऊन ते अत्यंत तन्मयतेने गात होते. इतक्यात अचानक त्यांना हार्ट अटॅकचा झटका आला. छातीत कळ उठली. त्यांनी लगेच तिरंगा दुसऱ्याच्या हातात दिला आणि जमिनीवर अंग टाकलं. ते कोसळत असताना लोकांना वाटलं बलजीत अभिनय करत आहेत. लोक उठून उभे राहिले. त्यांनी टाळ्यांचा कडकडाट झाला परंतू इकडे मात्र माजी सैनिकाचा मृत्यू झाला होता.