मुंबई वृत्तसेवा । भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी एका मोठा गौप्यस्फोट केला आहे. काँग्रेस पक्षातील एक मोठा नेता ४ जून नंतर भाजपात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार आहे. निवडणुकीच्या काळात आम्हाला काँग्रेसमधील अदृश्यशक्तींनी मदत केलीय, असा दावाही नितेश राणे यांनी केला आहे. ते मीडियाशी ते बोलत होते.
नुकतेच नितेश राणे हे सहकुटुंब शिर्डीला आले होते. साईबाबांच्या दर्शनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर साईबाबांचे आशीर्वाद राहावे आणि पुन्हा त्यांच्याकडेच देशाचे नेतृत्व करतील अशी प्रार्थना त्यानी केली आहे. येत्या ४ जून रोजी महायुती अत्यंत ताकदीने निवडून येणार आहे. राज्यातील जनतेने मोदींच्या विचारांचे प्रतिनिधी निवडून देण्याचा निर्णय घेतला आहे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडण्यावरून छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण केली आहे. त्यावर नितेश राणे यांनी जोरदार टिका केली आह. ते म्हणाले, भुजबळांचं वैयक्तिक मत आहे. पक्षाचा आणि नेतृत्वाचा त्याच्याशी काही संबंध नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान कुणीही सहन करणार नाही. आव्हाड यांनी जो प्रकार केला तोच जर भाजप नेत्यांकडून घडला असता तर मविआच्या नेत्यांनी धिंगाणा घातला असता. ते जाणून बुजून केलेले कृत्य केल्याचे दिसून आले. असेही ते म्हणाले .