पंढरपूर प्रतिनिधी । महाराष्ट्राचे दैवत पंढरपूरमधील श्री विठ्ठल मंदिरात एक तळघर आढळून आले आहे. या तळघरात पुरातन मूर्ती व पुरातन वस्तू सापडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुरातत्व विभागाने घटनास्थळी धाव घेतली असून चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे. तळघरात काय सापडणार याकडे संपूर्ण विठ्ठल भक्तांचे लक्ष लागले आहे.
पंढरपूर येथील विठ्ठल मंदीरात एक तळघर आढळून आले. पुरातत्व विभागाचे अधिकारी, मंदिर समितीचे अधिकारी तसेच मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीत येथे काम सुरु केले असून आतापर्यंत यामध्ये विष्णूची मूर्ती, पादुका, एक लहान मूर्ती आणि काही नाणी सापडल्याची माहिती आहे.
विठ्ठल मंदिरात सध्या संवर्धनाचे काम सुरु आहे. या दरम्यान हे तळघर सापडले आहे. या तळघराचा रस्ता कुठपर्यंत जातो याची देखील माहिती घेतली जात आहे. विठ्ठल मंदिर हे वारकऱ्यांचं सर्वात मोठं देवस्थान आहे. येथे दरवर्षी लाखो लोकं विठ्ठलाच्या भेटीला येत असतात.