• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जिल्ह्यातील वाढते अपघात थांबविण्यासाठी विविध उपाययोजना करणार- जिल्हाधिकारी

user by user
May 31, 2024
in जळगाव
0
जिल्ह्यातील वाढते अपघात थांबविण्यासाठी विविध उपाययोजना करणार- जिल्हाधिकारी

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील वाढते अपघात रोखण्यासाठी जनजागृती बरोबर उपाययोजना करणे गरजेचे असून त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून बायपास रस्ता तात्काळ व्हावा, म्हणून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत आहे. हेल्मेट घालणे हे सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे असल्यामुळे इथून पुढे ती सवय लागावी म्हणून इथून पुढे जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या दुचाकी चालकांना हेल्मेट सक्ती करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी ३१ मे रोजी दुपारी २ वाजता यांनी बैठकीत सांगितले.

या बैठकीला अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, राज्य परिवहन मंडळाचे वाहतुक अधिकारी दिलीप बंजारा, राष्ट्रीय महामार्गचे अभियंता सुनील गजरे, बांधकाम विभागाचे अभियंता आर. व्ही. बिऱ्हाडे यांच्यासह विविध वाहतूक संघटनांचे,स्वयंसेवी संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, शहरातील वाढती गरज लक्षात घेवून योग्य ते वाहतुकीचे नियोजन करणे गरजेचे असून यासाठी महानगरपालिका, पोलीस आणि आर टी ओ यांनी समन्वयाने जिथे गरज असेल तिथे वाहतूक सुरक्षा संदर्भात उपाययोजना कराव्यात हे सांगून बाहेर येणारी जड वाहतूक बायपासचे काम होत नाही तो पर्यंत सुरु राहिल. येत्या काही महिन्यात ते काम पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन पाठपुरावा करेल. एकदा बायपासचे काम पूर्ण झाले की मुख्यरस्त्यावर सिग्नल यंत्रणा बसविण्याबरोबर ज्या ज्या गोष्टी वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने गरजेच्या आहेत त्या केल्या जातील. असेही त्यांनी सांगितले.

मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी यांनी हेही नमुद केले की, नागरिकांना दुचाकी वाहन चालवताना डोक्याची सुरक्षितता अत्यंत महत्वाची असते. आता शहरात सगळीकडे सिमेंटचे रस्ते झाल्यामुळे गाड्यांचे वेग वाढतायत, कमी वेगाने गाड्या चालविण्याची संस्कृती रूळविण्यासाठी सुरुवातीला वेगाने गाडी चालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशा सूचना देऊन लोकांना हेल्मेटची सवय लागावी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात येताना दुचाकीचालकांना हेल्मेट अनिवार्य करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

Previous Post

हातपाय तोडून शेतातील विहीरीत फेकून देण्याची वृध्दाला धमकी देम मारहाण !

Next Post

दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारला केले स्थानबध्द; कोल्हापूर कारागृहात रवानगी

Next Post
दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारला केले स्थानबध्द; कोल्हापूर कारागृहात रवानगी

दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारला केले स्थानबध्द; कोल्हापूर कारागृहात रवानगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !
जळगाव

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !

July 6, 2025
भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group