भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ शहरातील जुना सातारा परिसरात बुधवारी २९ मे रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास चारचाकीने जात असलेल्या माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांच्यावर हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार करून हत्या करण्यात आली होती. खुनातील प्रमुख आरोपी करण पथरोड याला नाशिक पोलिसांनी शुक्रवारी ३० मे रोजी रात्री १० वाजता द्वारका नगरातून अटक केली आहे. याबाबत भुसावळ शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी २९ मे २०२४ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास भुसावलातील जुना सातारा परिसरातल्या मरिमाता मंदिराच्या समोर माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांच्यावर टोळक्याने अंधाधुंद गोळीबार केला होता. या या दोघांचा मृत्यू झाल्याने परिसर हादरला होता. याप्रकरणी केल्याप्रकरणी माजी नगरसेवक राजू सुर्यवंशीसह शिव पथरोड, विष्णू पथरोड, विनोद चावरिया, सोनू पंडीत, टकरन पथरोड, नितीन पथरोड, बंटी पथरोड यांच्यासह अन्य २-३ अनोळखी इसमविरुद्ध भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यातील विनोद चावरिया आणि राजू सुर्यवंशी यांना कालच पोलिसांनी गजाआड केले होते. तर, या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी करण पथरोड याने घटना घडल्यानंतर नाशिक येथे पलायन केले होते. तो शुक्रवारी ३० मे रोजी रात्री १० वाजता नाशिकमधील द्वारका परिसरात आला असता नाशिक पोलिसांच्या पथकाने त्याला शिताफीने अटक केली.