• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

ब्रेकींग : दुध फेडरेशन येथील राजा मयूर यांच्या बंगल्यावर दरोडा

user by user
May 31, 2024
in क्राईम, जळगाव
0
ब्रेकींग : दुध फेडरेशन येथील राजा मयूर यांच्या बंगल्यावर दरोडा

जळगाव प्रतिनिधी । राजा ट्रॅक्टरचे मालक राजा मयूर उर्फ राजेंद्र अनिल मयूर यांच्या बंगल्यावर काम करणाऱ्यानेच इतर सहकाऱ्यांच्या मदतीने गुंगीचे औषध सरबत मध्ये ठाकून दरोडा टाकल्याची घटना मध्यरात्री घडली आहे. घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले असून पुढील चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, जळगाव शहरातील दुध फेडरेशन परिसरात राजा मयूर हे आपल्या पत्नी शैला मयूर यांच्यासोबत वास्तव्याला आहे. त्यांच्या बंगल्यावर दोन सुरक्षा रक्षक आणि घरातील काम करणारा गोपाळ नेपाळी हा कामाला आहे. गोपाळ नेपाळी याने भावाला मुलगा झाला आहे असे सांगून गुरूवारी ३० मे रोजी रात्री १०.३० वाजता बंगल्यावर असलेले दोन सुरक्षा रक्षकांना गुंगीचे औषध टाकून सरबत पाजले. त्यानंतर त्याने हेच सरबत राजा मयूर यांना देखील पाजले. त्यामुळे तिघेजण बेशुध्द झाले. त्यानंतर गोपाळ नेपाळी याने त्यांचे इतर चार साथीदारांना बोलावून मध्यरात्री २ वाजता बंगल्यावर आले. त्यावेळी शैला मयूर यांना स्क्रु ड्रायव्हरचा धाक दाखवत त्यांना बाथरूममध्ये कोंबून ठेवले. त्यानंतर घरातील कपाट, कॉटमधील सर्व सामान अस्तव्यस्त करून घरातून मुद्देमाल व त्यांचे दोन आयफोन चोरून नेले.

राजा मयूर हे जैन हिल्स येथे सकाळी फिरायला जातात. त्यांना घेण्यासाठी कांतीलाल टाक हा ड्रायव्हर रोज सकाळी घेण्यासाठी येतो. आज नेहमी प्रमाणे कांतीलालने राजा मयूर यांना फोन केला. परंतू त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे कांतीलालने राजा मयूर यांच्या भाऊ भरत मयूर यांना फोन करून सांगितले. त्यानंतर भरत मयूर हे राजा मयूर यांच्या बंगल्यावर आले असता बंगल्याच्या बाहेर सुरक्षा रक्षक बेशुध्दावस्थेत मिळून आले. तर घरात जावून पाहणी केली तर राजा मयूर हे देखल बेशुध्दावस्थेत होते. त्यांनी शैला मयूर यांना बाथरूममधून बाहेर आणले. त्यावेळी शैला मयूर या प्रचंड भयभीत झालेल्या होत्या. त्यांनी सर्व हकीकत भरत मयूर यांना सांगितले. त्यानंतर या घटनेची माहिती पोलीसांनी कळविली. पोलीसांनी घटनास्थळी येवून पाहणी केली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Previous Post

माणुसकी आजही जिवंत आहे याचं खास उदाहरण !; दोन बेवारस मुतदेहांवर विधिवत अंत्यसंस्कार !

Next Post

भुसावळ डबल मर्डर प्रकरणातील मुख्य आरोपीला नाशिकमधून अटक

Next Post
भुसावळ डबल मर्डर प्रकरणातील मुख्य आरोपीला नाशिकमधून अटक

भुसावळ डबल मर्डर प्रकरणातील मुख्य आरोपीला नाशिकमधून अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !
क्राईम

म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !

July 5, 2025
खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !
क्राईम

खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !

July 5, 2025
‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !
क्राईम

‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !

July 5, 2025
आजचा दिवस या लोकांसाठी जाणार भरभराटीचा !
राशीभविष्य

घर आणि व्यवसाय या दोन्ही ठिकाणी सुसंवाद राखणे आवश्यक !

July 5, 2025
छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group