धरणगाव प्रतिनिधी । गेल्या अनेक वर्षानंतर यंदा भीषण दुष्काळाला धरणगाव तालुक्यातील नागरीकांना सामोरे जावे लागत आहे. याकडे जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांचे दुर्लक्ष झाले असून शिवसेना उबाठाच्या वतीने वेळोवेळी आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले आहे. शासनाने धरणगाव तालुका दुष्काळ जाहीर करावा, व शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याच्या मागणीसाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे धरणगाव तहसील कार्यालयात येवून तहसीलदार महेंद्र सुर्यवंशी व तालुका कृषी आधिकारी चंद्रकांत देशमाने यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासन धरणगाव तालुक्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. दुष्काळासारखी परिस्थीत असतांना कोणत्याही स्वरूपाच्या उपाययोजन केल्या जात नाही. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणे, जनावरांना चारा छावण्या लावणे, सहकारी कर्जाचे पुर्नगठण करणे, शेतीच्या संबंधित कर्जाची वसुली स्थगित करणे, विद्यार्थी वर्गाचे परीक्षा शुल्क परत मिळणे, टॅंकरने पाणीपुरवठा उपलब्ध करणे, मनरेगा अंतर्गत सिंचन विहीरी मिळणे, नवीन बोअरवेलचे प्रस्ताव सादर करणे, चारासाठी बियाणे मिळणे, तालुक्यातील गावांमध्ये ५० पैशांच्या आत आणेवारी कमी लावणे यासह धरणगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावी अशी मागणी केले आहे.
याप्रसंगी पक्षाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव पाटील, तालुकाप्रमुख जयदीप पाटील, राजेंद्र ठाकरे, कृपाराम महाजन, भागवत चौधरी, जितूभाऊ धनगर, किरण भाऊसाहेब, संतोष सोनवणे, हेमंत महाजन, रमेश पांडे, रणजित पुरभे, करीम लाला, शरीफ भाई, नदीम भाई, वसिम कुरेशी, राहूल रोकडे, रणजित सिकरवार, अरूण पाटील यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थीत होते.