जळगाव प्रतिनिधी । समर्थ नगरात राहणाऱ्या महिलेचे घर काही दिवसांपासून बंद होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातून ६३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेल्याची घटना समोर आले आहे. याबाबत रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक असे की, संगीता काशिनाथ कोळंबे वय-४३ रा. समर्थ नगर पिंप्राळा, जळगाव या महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. २५ एप्रिल रोजीपासून त्यांचे घर बंद होते. हीच संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 63 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना बुधवारी 29 मे रोजी सकाळी 8 वाजता उघडकीला आली. त्यानंतर महिलेने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार रात्री 9 वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राजपूत हे करीत आहे.