जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या समोर आलेल्या फुले मार्केटमधील तीन दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडून ३५ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. यात चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील सेंटर फुले मार्केट येथील मैत्री कलेक्शन तसेच प्रणाली लेडीज टेलर आणि श्रीराम ड्रायफ्रूट्स हे तीन दुकानाचे शटर उचकावून आज प्रवेश करत अज्ञात चोरट्यांनी रोकड आणि काही मुद्देमाल असा एकूण ३५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना २९ मे रोजी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मैत्री कलेक्शनचे मालक किरण विठ्ठल कुंभार रा. तरसोद तसेच इतर दुकानांचे मालक देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात चोरी झाल्याबाबत तक्रार देण्यात आली. त्यानुसार सायंकाळी 7 वाजता शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.