भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील शिंदी गावात ईलेक्ट्रीक खंब्यावर काम करत असतांना ईलेक्ट्रीकचा शॉक लागल्याने सुनिल अशोक सपकाळे वय ४५ याचा खंब्यावरून खाली पडल्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
सुनिल सपकाळे हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला होते. मंगळवारी २८ मे रोजी सकाळी १० वाजता ते ईलेक्ट्रीक पोलवर काम करत असतांना त्यांना विजेचा धक्का बसला. त्यात ते पोलवरून खाली पडले, यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाले. त्यांना तातडीने वरणगाव येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.