Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शासकीय अनुदानातून खंडणीची मागणी ; गटशिक्षणाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
    अमळनेर

    शासकीय अनुदानातून खंडणीची मागणी ; गटशिक्षणाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

    userBy userMay 29, 2024Updated:May 29, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर प्रतिनिधी ।

    अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथील शाळेची मान्यता रद्द करण्याची धमकी देत शाळेला मिळालेली शासकीय अनुदानातील ५ टक्के रक्कमेची खंडणी अमळनेर पंचायत समिती कार्यालयात गटशिक्षणाधिकाऱ्यांनी मागितल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.  याप्रकरणी गटशिक्षणाधिकाऱ्यावर अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे अमळनेर पंचायत समिती कार्यालयात खळबळ उडाली आहे.

    अधिक माहिती अशी की, गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी अमळनेर तालुक्यातील जवखेड येथील शाळेबद्दल एका व्हॉटसॲपवर बदनामीकारण मजकूर टाकला होता. त्यामुळे शाळेचे लिपीक उमेश राजेंद्र पाटील यांनी अमळनेर पंचायत समिती यांच्याकडे २७ मे रोजी अर्ज केलेला होता. त्याची नकल घेण्यासाठी उमेश पाटील व शाळेचे सहकारी अमळनेर पंचायत समिती कार्यालयात मंगळवारी २८ मे रोजी सकाळी १०.३० वाजता गेले होते. त्यावेळी उमेश पाटील व सहकारी यांनी गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांची भेट घेवून शाळेची बदनामी करून नका असे सांगितले. त्यावर रावसाहेब पाटील यांनी शिवीगाळ करून सन-२०१२ पासून तुमच्या शाळेतला जे शासकीय अनुदान मिळज्ञले आहे. त्याचेवर मला ५ टक्के दराने पैसे द्या नाहीतर तुमच्या शाळेची मान्यता रद्द करण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर उमेश पाटील व त्यांचे सहकारी यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार रात्री १०.३० वाजता गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विनोद सोनवणे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    user
    • Website

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.