धरणगाव प्रतिनिधी | धरणगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या महिलेला जबरदस्ती दुचाकीवर बसवून वेगवेगळ्या ठिकाणी नेवून तिच्यावर जबरी अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात 28 वर्षीय महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. याच गावात राहणारा संशयित आरोपी पंकज विठ्ठल महाजन याने 26 जानेवारी ते 26 मे दरम्यान महिलेला जबरदस्ती दुचाकीवर बसवून शिरपूरसह इतर ठिकठिकाणी नेऊन तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. दरम्यान पीडित महिलेने या धरणगाव पोलिसात धाव घेऊन फिर्यादी त्यानुसार मंगळवारी 28 मे रोजी मध्यरात्री एक वाजता संशयित आरोपी पंकज विठ्ठल महाजन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडील तपास सहय्यक पोलीस निरीक्षक सचिन शिरसाठ हे करीत आहे.