जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, जळगाव तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी २७ मे रोजी सायंकाळी ५ वाजता अल्पवयीन मुलगी ही घरी एकटी असतांना तिला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. तिच्या नातेवाईकांनी अल्पवयीन मुलीचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर मंगळवारी २८ मे रोजी दुपारी ३ वाजता पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी पोलीसात धााव घेवून तक्रार दिली. त्यानुसार जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत अहीरे हे करीत आहे.