जळगाव प्रतिनिधी ।
सराफ बाजार परिसरातील सौरभ ज्वेलर्स दरोडा प्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली होती. अटकेतील सर्वांना सोमवारी 27 मे रोजी दुपारी 4 वाजता जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने संशयित आरोपींना 30 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सायंकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव
शहरातील सराफ बाजारातील भवानी माता मंदिरासमोर महेंद्र कोठारी यांच्या सौरभ ज्वेलर्स या दुकानावर सोमवार, 20 मे रोजी पहाटे 3 वाजता दरोडा टाकण्यात आला होता. या प्रकरणात पुणे येथून रणजिंतसिंग जुन्नी याला ताब्यात घेण्यात आले होते. त्याने दिलेल्या माहितीवरून सागरसिंग जुन्नी, जयंतसिंग जुन्नी, सोनू सारवान, रितेश संतोष आसेरी, दीपक भक्तराज गोयल यांचा समावेश आहे. यांना देखील अटक करण्यात आली होती या सहा जणांना 27 मे पर्यंत पोलीस पठाडे सोडवण्यात आले होते दरम्यान पोलीस कोठडी संपल्यानंतर पुन्हा सोमवारी 27 मे रोजी दुपारी चार वाजता न्यायालयात हजर केले असता अटकेतील सहा जणांना न्यायालयाने 30 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्याचे आदेश दिले आहे.
अटक केलेल्या दरोडेखोरांकडून 1 लाख 20 हजार रुपयांची चांदी तसेच दरोड्यात वापरण्यात आलेल्या तीनही दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी 27 मे रोजी सायंकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.