अमळनेर प्रतिनिधी ।
तालुक्यातील सावखेडा रस्त्यावरून अवैधपणे मालवाहू वाहनातून निर्दयीपणे गुरांची वाहतूक करणारे वाहन शनिवारी 25 मे रोजी पहाटे 5.30 वाजता पोलिसांनी पकडले. याप्रकरणी दुपारी 12 वाजता अमळनेर पोलिसात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील सावखेडा गावाजवळून असलेल्या रस्त्यावरून मालवाहू वाहनातून विनापरवाना निर्दयपणे गुरांची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास देवरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकाने शनिवारी 25 मे रोजी पहाटे 5.30 वाजता कारवाई करत वाहन क्रमांक (एमएच 21 बीएच 7012) हे पकडले. त्यामध्ये तीन गाईंची निर्दयपणे वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी तीनही गाईंची सुटका करत वाहन ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल उदय बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुपारी 12 वाजता चालक सुनील केशव आव्हाड वय-33 आणि क्लीनर सागर श्रीमंत मगरे वय-29 दोन्ही राहणार सिल्लोड जि. छत्रपती संभाजी नगर
या दोघांवर अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव करीत आहे.