यावल प्रतिनिधी । यावल तालुक्यातील दहिगाव येथील एका ३५ वर्षीय तरूणाने भुसावळ जवळील तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन शुक्रवारी २४ मे रोजी दुपारी घडली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
शंकर मदन रल (वय ३५, रा. विरावली, ह. मु. दहिगाव ता.यावल) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. शंकर रल हा तरूण शुक्रवारी दुचाकीव्दारे भुसावळ शहराबाहेरील तापी नदीच्या पुलावर गेला. पुलावर दुचाकी लावुन त्याने थेट नदी पात्रात उडी घेतली. हा प्रकार नागरीकांच्या निर्दशनास येताचं त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी व नातलगांनी जावुन मृतदेह यावल ग्रामिण रूग्णालयात आणला. याठिकाणी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला होता. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप सुर्यवंशी करीत आहे.