Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नेत्रम ऑप्टिकल्स समोरून दुचाकीची चोरी; जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल
    क्राईम

    नेत्रम ऑप्टिकल्स समोरून दुचाकीची चोरी; जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल

    userBy userMay 25, 2024Updated:May 25, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । शहरातील गोलाणी मार्केट येथील नेत्रम ऑप्टिकल्स समोरून एकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना १९ मे रोजी दुपारी १ वाजता घडली आहे. याप्रकरणी शुक्रवारी २४ मे रोजी दुपारी १२ वाजता जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

    नंदू महारु भोई वय-४३, रा. शिवशंकर कॉलनी, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ते गोलाणी मार्केट जवळील नेत्रम ऑप्टिकल समोर मुरमुरे शेव विक्री करण्याचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत असतात. नेहमीप्रमाणे १९ मे रोजी दुपारी १ वाजता त्यांनी त्यांची दुचाकी (एमएच १९ बीआर ५९४६) दुकानासमोर लावली होती.  त्यावेळी अज्ञात चोरट्याने ही दुचाकी चोरून नेली. दरम्यान दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला. परंतु दुचाकीबाबत कोणतेही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी शुक्रवारी २४ मे रोजी दुपारी १२ वाजता शहर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    user
    • Website

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.