जळगाव प्रतिनिधी । चारण्यासाठी गेलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलगा हा मुर्दापूर धरणाच्या पाण्यात होण्यासाठी गेला असता त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी 25 मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे याप्रकरणी पोलिसात आकस्मात भरतीची नोंद करण्यात आली. हर्षल अशोक चौधरी (वय १४, रा. नशिराबाद, ता. जळगाव) असे मयत झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, हर्षल चौधरी हा मुलगा अंघोळीसाठी मुर्दापूर धरणाच्या पाण्यात पोहणाासाठी उतरला. परंतु त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास उघडकीस आली. पाच बहीणींचा एकुलत्या एक भावाचा दुर्देवी मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
हर्षलच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने आणि तसेच शाळेला सुट्ट्या असल्यामुळे हर्षल हा गावातील काही जणांच्या म्हशी घेवून त्या चरण्यासाठी गावाजवळ असलेल्या मुर्दापूर धरणाच्या परिसरात जात होता. आज देखील तो म्हशींना चरण्यासाठी घेवून गेला होता. मात्र सकाळपासून पडणाऱ्या रणरणत्या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असल्याने हर्षल हा पोहण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरला. मात्र त्याला धरणाच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्यात बुडू लागला. काही मिनिटात हर्षलच्या नाका तोंडात पाणी जावून त्याचा दुर्देवी मृत्यू झाला.
धरणाच्या पाण्यात हर्षल बुडत असल्याचे दिसताच नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेतली. त्यानंतर काही ग्रामस्थांच्या मदतीने हर्षलला पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर त्याला तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत हर्षल यास मयत घोषीत केले.