मुक्ताईनगर प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हाकाकोडा येथील शेतात उष्माघातामुळे 100 मेंढ्या मृत्युमुखी पडल्याची घटना उघडकीला आली आहे. यामध्ये मेंढपाळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या ठिकाणी तहसीलदार यांच्या पथकाने तातडीने पंचनामे करावे असे आदेश देण्यात आले आहे.
‘सदर घटनेची माहिती मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना व्हिडिओ कॉल द्वारे दिली असून शासन व प्रशासन सर्वतोपरी आपल्या सोबत असून हवी ती मदत आपणास करणार या शब्दात मेंढपाळ बांधवांना दिलासा दिला.
याप्रसंगी अशोकभाऊ कांडेलकर, शिवसेना तालुकाप्रमुख नवनीत पाटील, विभाग प्रमुख विनोद पाटील, पंकज पांडव, रणजीत गोयंका,सतीश नागरे, विनोद चौधरी, दीपक वाघ, दिलीप भोलानकर, अविनाश वाढे, पंकज धाबे, राहुल खेडकर, पांडुरंग तांबे, योगेश मुळक, गणेश सोनवणे, विष्णू पाटील, शेख फारूक, जावेद खान तसेच वर्षातील शेतकरी बांधव उपस्थित होते.