मराठी सिनेसृष्टीमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर मुंबईतील टाटा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रवींद्र बेर्डे यांनी मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं होतं.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, मागच्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील टाटा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर दोन ते तीन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून घरी आणले होते मात्र त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. ते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे बंधू होत. हमाल दे धमाल, चंगू मंगू, थरथराट, झपाटलेला, एक गाडी बाकी अनाडी, यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका बजावली होती. रवींद्र बेर्डे यांनी 300 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं होत.