आजकाल अपघाताचे प्रमाण वाढले असून अपघातात मृत होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. अशातच उत्तरप्रदेश मधून एका अपघाताची बातमी समोर येत आहे. डंपर आणि कारमध्ये धडक होऊन दोन्ही गाड्यांनी पेट घेतल्याने कारमधील आठ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, रात्री 11 वाजता बरेलीहून नैनिताल हायवेवरून हि कार बहेडीकडे जात असतं महामार्गावरील भोजीपुराजवळ अचानक वाहनाचे नियंत्रण सुटले आणि कार दुभाजक ओलांडून पलीकडे गेली. त्यावेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरला कार धडकली. हि धडक होऊन दोन्ही गाड्यांनी पेट घेतला.कारमधील आठ जणांना वेळेवर बाहेर पडत आली नाही आणि त्यांचा होरपळून मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. कार आणि डंपरमधील आग विझवण्याचे प्रयत्न तातडीने सुरू करण्यात आले.