डिसेंबर महिना लागला तर अजून हुडहुडी भरवणारी थंडी कशी पडत नाही असा प्रश्न पडला आहे. आता हवामान विभागाने सांगितले कि येणाऱ्या आठवड्यात कमाल तापमानात घेत होऊन गुलाबी थंडी पडू शकते त्यामुळे उबदार कपडे घालून बाहेर पडावे लागणार आहे. अजूनही मुंबईसह राज्यात हुडहुडी भरविणारी थंडी पडली नाही.
हवामान विभागाच्या म्हण्यानुसार सध्याच्या एल – निनोच्या वर्षात थंडीचा पॅटर्न वेगळा जाणवत आहे. पण हवामानात बदल झाला तर कदाचित कडाक्याची थंडी देखील पडू शकते. कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता जाणवत आहे. पुढील ८ ते १० दिवसात राज्यात कमाल तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे किमान तापमानातही घट होऊन गारठा वाढू शकतो.