जळगाव: जळगावातील वडनगरी येथे बडे जटादेव महादेव मंदिरात ५ डिसेंबर पासून पंडित मिश्रा यांची शिवमहापुराण कथा सुरु आहे. या शिवमहापुराण कथेला दररोज लाखो भाविक येत असतात. याच गर्दीचा फायदा घेऊन सोन्याची पोट चोरल्याचा घटना घडल्या होत्या या प्रकरणी एलसीबीच्या पथकाने २० जणांना ताब्यात घेतले होते.
अशातच पुन्हा गुरुवार रोजी शिवमहापुराण कथेमधून दहा जणांना ताब्यात घेतले असून यातील महिला या राजस्थान अलवर, भरतपूर मधील आहेत. यांची सखोल चौकशी केली असता यांची टोळी असल्याची माहिती मिळाली. संशयितांना पथकाने अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना ९ डिसेम्बर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.