कोपरगावातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. तुटलेला पतंग पकडण्यासाठी धावताना धाप लागल्याने श्वास बंद होऊन जीवनाचा अंत झाल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमधील कोपरगावात घडली. साहिल गांगुर्डे असे मयत मुलाचे नाव असून तो इयत्ता सातवीत जिल्हा परिषदच्या शाळेत शिक्षण घेत होता.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि शाळा सुटल्यानंतर साहिल घरी आला आणि त्याचवेळी घराशेजारीच पतंग उडवणाऱ्या मुलांचा पतंग कापला गेल्याने तो पतंग पकडण्यासाठी साहिल जोरात धावला. तुटलेला पतंग त्याने पकडला मात्र खूप जोरात धावल्याने त्याला धाप लागली हि घटना त्याच्या आईवडिलांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ साहिलला जवळच्या दवाखान्यात उपचारासाठी घेऊन गेले असता त्याची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी त्याला कोपरगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले.
जोरात धावून त्याचा श्वास बंद झाल्याने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे साहिलच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.