बॉलीवूड मधून एक वाईट बातमी समोर येतेय. सुप्रसिद्ध कलाकार ज्युनिअर मेहमूद यांचे निधन झाले आहे. ते गेल्या काही दिवसांपासून कॅन्सरशी झुंज देत होते. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
याबाबत अधिक माहिती अशी कि, ज्युनिअर मेहमूद हे गेल्या काही दिवसांपासून कॅन्सरशी झुंज देत होते.तसेच त्यांची तब्येत खूपच खराब झाली होती. डॉक्टरांनी 40 दिवसांपेक्षा जास्त दिवस ते जिवंत राहणार नाही, असे स्पष्ट सांगितले होते. आणि त्यांनी वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना नोव्हेंबरमध्ये कॅन्सरचे निदान झाले होते. त्यांचा कॅन्सर चौथ्या टप्प्यापर्यंत पोहचला होता.
ज्युनिअर मेहमुद यांनी अनेक चित्रपट त्याचबरोबर टीव्ही मालिकांमध्ये काम केले. ते फक्त 11 वर्षांचे असताना 1967 मध्ये संजीव कुमार यांचा नौनिहाल या चित्रपटातून त्यांनी करियरला सुरुवात केली होती. संघर्ष, ब्रह्मचारी, दो रास्ते, कटी पतंग, हाथी मेरे साथी, हंगामा, छोटी बहू, अशा अनेक चित्रपटांत त्यांनी काम केले होते. त्यांच्या जाण्याने बॉलिवूड विश्वावर शोककळा पसरली आहे.