Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पंडित मिश्रा यांच्या कथेत चोरांनी साधली संधी; मंगलपोत लांबविल्या, मध्यप्रदेशातील २७ संशयित महिलांना घेतले ताब्यात
    जळगाव

    पंडित मिश्रा यांच्या कथेत चोरांनी साधली संधी; मंगलपोत लांबविल्या, मध्यप्रदेशातील २७ संशयित महिलांना घेतले ताब्यात

    Team Live Maharashtra NewsBy Team Live Maharashtra NewsDecember 5, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : पंडित मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेला आजपासून म्हणजेच ५ डिसेंबरपासून कानळदा रोडवरील वडनगरी फाट्यावर करण्यात आले आहे. आज कथेचा पहिलाच दिवस असून शिव महापुराण कथा आज पहिल्याच दिवशी प्रचंड प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसून आले. पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या कथेला आज लक्षावधी भाविकांनी हजेरी लावली. मात्र याठिकाणी चोरट्यांनी संधी साधत भाविक महिलांच्या सोन्याच्या पोत चोरी केल्याप्रकरणी मध्यप्रदेशातील एकूण २७ संशयित महिलांना स्थानिक गुन्हे शाखेकडून पकडून पोलीस स्टेशनला आणण्यात आले आहे.

    सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, आजपासून सुरु झालेल्या शिवमहापुराण कथेसाठी दोन हजारपेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची मोठी तारांबळ उडत आहे. मात्र याठिकाणी चोरट्यांनी संधी साधत भाविक महिलांच्या सोन्याच्या पोत चोरी केल्याप्रकरणी मध्यप्रदेशातील एकूण २७ संशयित महिलांना स्थानिक गुन्हे शाखेकडून पकडून पोलीस स्टेशनला आणण्यात आले आहे.

    तीन भाविक महिलांच्या ३९५ नुसार तक्रारी घेण्यात आल्या असून अजून काही महिला तक्रार देत आहेत. दरम्यान, पोत चोरणाऱ्या एकूण २७ संशयित महिला असून त्या सर्व मध्यप्रदेशातील इंदोर, सेंधवा तसेच इतर गावातील असल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त होत आहे. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला महिला भाविकांची गर्दी झालेली दिसून आली.

    Bhakti Crime December Madhya Pradesh गुन्हे डिसेंबर भाविक मध्यप्रदेश
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Team Live Maharashtra News

    Related Posts

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे जळगाव तालुका अध्यक्षपदी सुमित पाटील व उपाध्यक्षपदी प्रविण पाटील यांची नियुक्ती

    February 5, 2026

    खळबळजनक : अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह जाळल्याचा संशय !

    February 5, 2026

    दोन दुचाकीची जबर धडक : दोन तरुण जागीच ठार !

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.