शासकीय विश्रामगृह अकोला या ठिकाणी जागतिक विकलांग दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय अपंग विकास महासंघ या एकमेव राज्यव्यापी चळवळीच्या वतीने जागतिक दिव्यांग दिवस महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी जिल्ह्यातील विविध प्रकारचे दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वप्रथम दिव्यांगांच्या समस्यांवर राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या वतीने विशेष चर्चासत्र घेण्यात आले असून यामध्ये दिव्यांगाच्या अनेक अडीअडचणी समजून घेतल्या तसेच प्रत्येक समस्यावर संबंधित शासकीय अधिकाऱ्यांची संपर्क साधून संबंधित तालुक्यातील पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन या समस्या सोडविण्याचे आश्वासन यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आले.
यावेळी जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना अपंग वित्त व विकास महामंडळाच्या वतीने कर्जाचे वितरण करण्यात आले त्याचप्रमाणे नवीन कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या दिव्यांग बांधवांना कर्जाच्या फार्मचे वितरण सुद्धा करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सोबतच विविध योजना असलेल्या महामंडळाच्या वतीने सदर योजनांचे सखोल माहिती सुद्धा देण्यात आली.