जळगाव येथे आज सकाळी गजानन विठ्ठल हटकर यांच्या म्हैसी जंगलात गट नंबर १२३,१२४च्या शेजारच्या पडीत शेतात चराईसाठी गेल्या होत्या ११:३०च्या सुमारास या म्हैसी चरत असतांना गुरु प्रभा पावर प्लॅन्ट कंपनीच्या हद्दीत जमिनीवर तुटून पडलेल्या विद्युत वाहक तारांना चरत असलेल्या म्हैसीचा स्पर्श होउन गजानन हटकर यांची म्हैस जागीच दगावली.
सुदैवाने हि गोष्ट लक्षात आल्याने बाकीच्यां म्हैसी पशुधनमालकाच्या सतर्कतेमुळे वाचल्या .या घटनेची माहिती कळवल्यावर महावितरणचे कनिष्ठ तांत्रिक सहाय्याक फिरोज तडवी, पशुवैद्यकिय दवाखाना म्हसावद येथील कर्मचारी प्रेमराज मराठे हे घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी घडलेल्या घटनेची माहिती व छायाचित्र त्यांनी वरिष्ठांना पाठवल्याची माहिती मिळाली.
पशुधनमालक यांनी या घटनेच्या बाबतीत महावितरण संदर्भात संताप व्यक्त केला विद्युत वाहक तारा या दोन तिन दिवसापूर्वीच तुटून पडल्याचे त्यांचं म्हणणं आहे महावितरण विभागाला या बाबतीत कुठलीही माहिती नाही याच हलगर्जीपणामुळे माझ नुकसान झाले. दगावलेल्या म्हैसीने आठ दहा दिवसापूर्वी पिलाला जन्म दिला आहे. एकंदरीत दुधाळ म्हैस दगावल्यान गजानन हटकर यांचे मोठं आर्थिक नुकसान झाले आहे. या ठिकाणी उपस्थितीत नागरिकांनमध्ये महावितरण व पशुवैद्यकिय विभागाकडून सुरवातीला योग्य सहकार्य न झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला. दोन तीन दिवस विद्युत प्रवाह सुरू असलेल्या विद्युत वाहक तारा जमिनीवर पडून होत्या या गोष्टीला जबाबदार कोण?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महावितरण विभागाने पशुधनमालक यांच्या झालेल्या नुकसानीची गांभीर्याने दखल घेऊन त्यांना नुकसान भरपाई मिळवुन द्यावी हिच अपेक्षा व्यक्त होत आहे.