सद्या गुरु ग्रह मेष राशीत आहे. ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रहाला महत्त्वाचं मानलं जात. येत्या 31 डिसेंबरला गुरु ग्रह मार्गस्थ होणार असून याचा प्रभाव सर्व राशिचक्रातल्या बारा राशींवर होणार आहे. पण या योगाचा फायदा काही राशींना होणार आहे तर कोणत्या राशींना कोणता फायदा होणार आहे हे जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून.
मेष रास
मेष राशींच्या लोकांना या काळात अनेक शुभवार्ता मिळू शकतात. याशिवाय नोकरी करणार्यांना नोकरीत प्रमोशन मिळण्याचेही योग आहेत. बेरोजगारांना नोकरीच्या चांगल्या ऑफर येऊ शकतात. आरोग्यात सुधारणा दिसून येईल.
कर्क रास
कर्क राशींच्या लोकांना या काळात विशेष लाभ होऊ शकतो. व्यवसायात भरभराट होण्याचे योग आहेत. खाण्यापिण्याची चंगळ राहील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम आहे. नोकरीत बदल होऊ शकतो.