साहित्य
पाणी, तेल, मिठ, बेसन, हळद, ओव्याची पुड,तेल
कृती
सर्वप्रथम, तेल, ओवापुड आणि पाणी एकत्र करून फेटून घ्यावे. नीट एकजीव होवू द्या. मिश्रण चांगले पांढरे झाले पाहिजे. या मिश्रणात चवीपुरते मीठ आणि हळद घालून एकत्र करा. यामध्ये चमचा-चमचा बेसन घालून चांगले घोटावे. बऱ्यापैकी घट्टसर मिश्रण करावे. पातळ अजिबात नको, पण एकदम पिठाचा गोळाही मळू नये. सोऱ्यामध्ये बारीक शेवेची ताटली बसवावी व आतल्या बाजूने तेलाचा हात लावावा.
कढईत तेल गरम करायला ठेवावे. मिश्रण सोऱ्यामध्ये गरम तेलात आतून बाहेर असे २-३ वेळा गोलाकारात शेव पाडावी. म शेव तळून घ्यावी. जास्तवेळ तळू नये, यामुळे शेवेचा रंग बदलतो. तळलेली शेव टिश्यू पेपरवर काढावी. नंतर शेव हलक्या हाताने चुरडून घ्यावी.