साहित्य
काजू पावडर, मिल्क पावडर, साखर, पाणी
कृती
सर्वप्रथम, काजूची बारीक पावडर करुन घ्या. त्यानंतर ती चाळणीने चाळून घ्या. काजूच्या पावडरमध्ये मिल्क पावडर मिसळा. यानंतर कडईत साखर घालून साखर बुडेल इतपत पाणी टाका. पाक तयार करुन घ्या. पाकात काजूचे संपूर्ण मिश्रण मिक्स करा. त्यानंतर परत गॅस चालू करा.
काजूच्या मिश्रणाचा गोळा झाल्यावर गॅस बंद करा. त्यानंतर लगेच बटर पेपरवर कढईतले काजूचे मिश्रण काढा आणि लाटून घ्या. यानंतर ते काजूकतलीच्या आकारात कापून घ्या. त्यानंतर सजावटीसाठी काजूचा वर्ख लावा.