साहित्य
पनीर, तेल, हळद, लाल तिखट,मीठ, शिमला मिरची, लवंग,वेलची,कांदा,टोमॅटो,हळद,लाल तिखट,धने पुड,कसूरी मेथी,जिरे,तेजपान,दालचिनी
कृती
सर्वप्रथम, पनीर पाण्यात भिजवून ठेवा. यानंतर पनीरचे मध्यम आकाराचे काप करा. कापलेल्या पनीरच्या तुकड्यांमध्ये हळद, मीठ आणि लाल तिखट टाका आणि हे मिश्रण एकत्र करा. नंतर हे पनीर दहा मिनिटे झाकून ठेवा.एका कढईत तेल गरम करा. त्यात हे पनीरचे तुकडे तळून घ्या.
त्यानंतर चिरलेली शिमला मिरची आणि बारीक चिरलेला कांद्या तळून घ्या.त्यानंतर गरम तेलात लवंग, वेलची परतून घ्या आणि त्यात पुन्हा चिरलेला कांदा चांगला परतून घ्या.त्यात आलं लसणाची पेस्ट टाकात्यानंतर बारीक चिरलेले टोमॅटो त्यात टाका आणि थोडे मीठ टाका हे मिश्रण थंड होऊ द्या त्यानंतर हे मिश्रण मिक्सरमधून बारीक करा.त्याच कढईत पुन्हा तेल गरम करात्यात जिरे, दालचिनी, आणि तेजपान टाका.तयार केलेली कांदा टोमॅटोची पेस्ट यात टाका आणि चांगले परतून घ्या.त्यानंतर यात हळद, लाल तिखट, धने पूड टाकामसाल्याला तेल सुटल्यानंतर त्यात पाणी घाला.
तळलेला कांदा आणि शिमला मिरची यात टाकाआता यात गरम मसाला टाकात्यानंतर तळून घेतेलेले पनीर यात टाका आणि चांगले परतून घ्या. त्यानंतरकसूरीमेथी टाकाथोडा वेळ शिजवल्यानंतर त्यात कोथिंबीर टाका.