दिल्ली मधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. दिल्लीत शनिवारी पुन्हा भूकंप झाला आहे. २.६ रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तिव्रता आहे. भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण आहे. झालेल्या भूकंपात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी कि, शनिवारी दुपारच्या सुमारास नागरिक आपआपल्या कामात व्यस्त असताना अचानक जमिनीला हादरे बसू लागले. भूकंप आल्याचं समजतात नागरिकांनी आपल्या घरातून बाहेर पळ काढला. भूकंपाची तिव्रता २.६ रिश्टर स्केल इतकी होती. याआधी ६ नोव्हेंबरला दिल्ली-एनसीआरमध्ये जोरदार भूकंपाचे झटके बसले होते. त्यावेळी ५.६ रिश्टर स्केल इतक्या भूकंपाची नोंद करण्यात आली होती.