साहित्य
कोबी, कांदा, कोथिंबीर, गव्हाचं पीठ, लसूण, आलं,हिरवी मिरचे, लाल तिखट, जिरे पूड, धने पूड, हळद, कढीपत्ता,गरम मसाला,बटाटा, तेल,तूप, मीठ
कृती
सर्वप्रथम, कोबी मिक्सरमधून बारीक करा. बारीक केलेल्या कोबीमध्ये स्वच्छ धुवून कोथिंबीर टाका बारीक चिरलेला कांदा त्यात टाका. यामध्ये दोन तीन लसणाच्या कळ्या आणि आलं टाका . हिरवी मिरचे टाका आणि थोडा कढीपत्ता टाका. आता हे मिश्रण पुन्हा मिक्सरमधून बारीक करा. या बारीक केलेल्या मिश्रणात जिरे पूड, धने पूड, हळद, गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि लाल मिरची पावडर टाका.
या मिश्रणात शिजवून घेतलेला बटाटा किसून टाका.त्यानंतर त्यात थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर पुन्हा टाका.हे मिश्रण एकत्र करा.गव्हाच्या पीठाची पोळी लाटून घ्या.त्यात हे मिश्रण भरा आणि पोळीचा पुन्हा गोळा करा. त्यानंतर हलक्या हाताने पराठा लाटून घ्यागरम तव्यावर तेल किंवा तूप टाकून पराठा दोन्ही भाजून भाजून घ्या.